दिलासा : जिल्ह्यात केवळ सात रुग्ण

दिवसभरात 50 करोनामुक्त; 145 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
दिलासा : जिल्ह्यात केवळ सात रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना संक्रमाणाची तीव्रता कमी होत असल्याने जिल्हावासीयांना सुखद अनुभव अनुभवायला मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुरुवारी तब्बल 12 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नसून जिल्ह्यात केवळ सात रुग्ण आढळून आलेले आहेत. तर दुसरीकडे 50 बाधितांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 1, यावल 1, पारोळा 1, चाळीसगाव 4 असे एकूण 7 रुग्णांचा समावेश आहे.

तर जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या 12 तालुक्यांमध्ये गुरुवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 487 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 767 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात उपचारादरम्यान भडगाव तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सद्यस्थितीला जिल्ह्यात 145 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com