दिलासा : जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण

दिवसभरात 26 करोनामुक्त; 237 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
दिलासा : जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव शहरासह तब्बल 12 तालुक्यांमध्ये मंगळवारी एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने जिल्हावसीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान दिवसभरात केवळ 6 रुग्ण आढळून आले असून 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्थितीला 237 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये भुसावळ 1, अमळनेर 2, जामनेर 1, चाळीसगाव 2 असे एकूण 6 रुग्णांचा समावेश आहे.

तर जळगावशहर, जळगाव ग्रामीण, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांमध्ये मंगळवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 475 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 664 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 574 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तसेच सद्यस्थितीला जिल्ह्यात 237 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com