जिल्ह्यात केवळ चार तालुक्यात आढळले करोनाचे नवे 16 रुग्ण

अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या पोहचली 280 वर : 12 तालुक्यातील एकही नवा रुग्ण नाही
जिल्ह्यात केवळ चार तालुक्यात आढळले करोनाचे नवे 16 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दुसरीकडे कोरोनातून बरे होणार्‍यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात आता केवळ 280 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची नोंद आहे.

शनिवारी जिल्ह्यात 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे 12 तालुक्यात नवा एकही रुग्ण न आढळून आल्याने दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 4, जळगाव ग्रामीण 0, भुसावळ 4, अमळनेर 0, चोपडा 0, पाचोरा 0, भडगाव 0, धरणगाव 0, यावल 0, एरंडोल 0, जामनेर 0, रावेर 1, पारोळा 0, चाळीसगाव 7, मुक्ताईनगर 0, बोदवड 0 व इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 16 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 447 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 593 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात 280 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍याची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्याच्यास्थितीला जिल्ह्यात 280 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com