जिल्ह्यात पुन्हा आढळले 498 पॉझिटीव्ह रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात पुन्हा आढळले 498 पॉझिटीव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी जिल्ह्यात एकूण 498 कोरोना बाधीत रुग्ण पुन्हा आढळुन आले आहे. दरम्यान आतापर्यंत 19,082 पॉझिटीव्ह रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळुन आले आहे. मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेणार्‍या एकूण 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये जळगाव शहरात 49, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 17, अमळनेर 82, चोपडा 43, पाचोरा 15, भडगाव 53, धरणगाव 26, यावल 09, एरंडोल 40, जामनेर 17, रावेर 17, पारोळा 32, चाळीसगाव 75 तर परजिल्ह्यातील 06 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यास्थितीत 13,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्या 5,228 रुग्णांवर उपचार सुुरु आहेत.

मंगळवारी जिल्ह्यात 07 कोरोनाबधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून, 03 रुग्णांचा मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात, दोन रुग्णांचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, एका रुग्णाचा मृत्यू रावेर येथे तर एकाचा चाळीसगाव येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 42 व 57 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 61 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com