जिल्ह्यातील सहा तालुक्यात 19 नवे बाधित रुग्ण

दिवसभरात 53 करोनामुक्त; दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू नाही
जिल्ह्यातील सहा तालुक्यात 19 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या दिड महिन्यांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात सहा तालुक्यात 19 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

तसेच 53 रुग्ण करोनामुक्त झाले असून दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 366 वर पोहचली आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 5, जळगाव ग्रामीण 0, भुसावळ 0, अमळनेर 0, चोपडा 0, पाचोरा 1, भडगाव 2, धरणगाव 0, यावल 0, एरंडोल 0, जामनेर 1, रावेर 3, पारोळा 0, चाळीसगाव 7, मुक्ताईनगर 0, बोदवड 0 व इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 19 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 395 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 456 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून मंगळवारी जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 573 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात 366 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍याची संख्या तीन पट अधिक आहे. आज दिवसभरात 53 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्याच्यास्थितीला जिल्ह्यात 366 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com