जिल्ह्यात करोनाचे नवे 20 रुग्ण

नऊ तालुक्यात एकही रुग्ण नाही
जिल्ह्यात करोनाचे नवे 20 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना संक्रमण मंदावत असल्याचे सद्यास्थितीला चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी नव्याने 20 रुग्ण आढळले असून, 62 बाधित करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय नऊ तालुक्यांमध्ये एकही करोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 03, भुसावळ 01, अमळनेर 01, चोपडा 01, जामनेर 02, चाळीसगाव 04, मुक्ताईनगर 02 असे एकूण 20 रुग्णांचा समावेश आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, बोदवड, या नऊ तालुक्यांमध्ये शुक्रवारी एकही रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 341 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 200 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2,571 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यास्थितीला जिल्ह्यात 570 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com