दिलासादायक : 13 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात नवे 12 रुग्ण : 63 बाधित करोनामुक्त,एकाचा मृत्यू
दिलासादायक : 13 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शासनाच्या माध्यमातून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केल्यामुळे कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी केवळ 12 रुग्ण आढळले असून 63 बाधितांची यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादम्यान एका बाधिताचा मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जळगाव शहरासह 13 तालुक्यांमध्ये गुरुवारी करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 4, चाळीसगाव 6 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 12 रुग्णांचा समावेश आहे. जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर व बोदवड या 13 तालुक्यांमध्ये गुरुवारी एकही रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 321 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 138 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 571 इतकी झाली आहे.जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍याची संख्या पाच पट अधिक आहे. आज दिवसभरात 63 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्याच्यास्थितीला जिल्ह्यात 612 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com