जिल्ह्यात एका दिवसात २२ हजार नागरिकांचे लसीकरण

आज शहरातील लसीकरण केंद्र राहणार बंद; तरुणाचा लसीकरणासाठी उत्साह
जिल्ह्यात एका दिवसात २२ हजार नागरिकांचे लसीकरण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या तीन चार दिवसांपासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरु आहे. आज दिवसभरात 18 वर्षावरील 19 हजार 447 तरुणांनी तर 45 वर्षावरील 4 हजार 146 असे एकूण 22 हजार 882 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला.

लसीकरणाचा वाढता प्रतिसादामुळे लसीचा पुन्हा तुटवडा झाल्याने जळगाव शहरातील सर्व लसीकरण केंद्र रविवारी बंद राहणार आहे.

करोनावर प्रतिबंधात्क उपाय म्हणून शासनाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. यातच आता 18 वर्षावरील सर्वांनाच लस दिली जात असल्याने तरुणांमध्ये लसीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. जिल्ह्यात आज 145 लसीकरण केंद्रावर लसीकरणाची मोहीम सुरु होती. यात 18 वर्षावरील 19 हजार 447 जणांनी तर 45 वर्षावरील 4 हजार 146 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला.

असे झाले लसीकरण

अमळनेर 164, भुसावळ 1658, बोदवड 181, भडगाव 168, चाळीसगाव 521, चोपडा 473, धरणगाव 194, एरंडोल 193, जामनेर 238, मुक्ताईनगर 273, पाचोरा 366, पारोळा 183, रावेर 438, यावल 382, जळगाव 1932, प्राथमिक आरोग्य केंद्र 11 हजार 989, उपकेंद्र 3529 असे एकूण 22 हजार 882 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला.

शहरातील लसीकरण केंद्र आज बंद

शहरासह जिल्ह्यात 18 वर्षावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तरुणाईकडून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे उद्या 27 जून रोजी लस उपलब्ध नसल्याने जळगाव शहरातील मनपाचे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com