जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बाराशेवर

दिवसभरात 47 नवे बाधित तर 141 रुग्ण करोनामुक्त; एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बाराशेवर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात 47 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 114 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तसेच दिवसभरात एका बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बाराशेवर आली आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 2, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 3, अमळनेर 2, चोपडा 4, पाचोरा 4, भडगाव 1, धरणगाव 3, यावल 3, एरंडोल 3, जामनेर 4, रावेर 4, पारोळा 5, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 2, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 47 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 29 एवढी झाली आहे. तर 1 लाख 38 हजार 243 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकाचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून मंगळवारी जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 569 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात 1 हजार 217 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍याची संख्या तीन पट अधिक आहे. आज दिवसभरात 114 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्याच्यास्थितीला जिल्ह्यात 1 हजर 217 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com