जिल्ह्यात 18 वर्षावरील 12 हजार तरुणाईने घेतला पहिला डोस

दिवसभरात 15 हजार 580 जणांचे लसीकरण
जिल्ह्यात 18 वर्षावरील 12 हजार तरुणाईने घेतला पहिला डोस

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

केंद्र शासनाने 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाची मोहीमेला मंगळवार पासून सुरुवात झाली.

आज दिवसभरात 18 वर्षावरील सुमारे 12 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतल्याने तरुणाईचा लसीकरणाचा चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचे जाहीर केल्यानंतर हे अभियान 21 जूनपासून सुरू केले. जिल्ह्यात पुरेशा लसींचा साठा उपलब्ध नसल्याने एक दिवस उशीराने या मोहीमेला मंगळवार पासून सुरुवात झाली.

जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक केंद्रांवर आज कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लशींचे डोस प्राप्त झाल्यानंतर सकाळी 9.30 पासून लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागासह शहरातील तरुणाईने लसीकणाला उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून सकाळपासून तरुणांची लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून आले.

जळगावात सर्वाधिक लसीकरण

शहरात महापालिकेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 9 लसीकेंद्रांवर आज सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसभरात या सर्व केंद्रांवर 2 हजार 228 जणांनी लसीचा डोस घेतल्याने सर्वाधिक लसीकरण आज जळगाव शहरात झाले असल्याचे दिसून आले.रेडक्रॉसच्या केंद्रावर दिवसभरात सुमारे 500 नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी 18 ते 44 वयोगटांतील 400 जणांचा समावेश होता.

139 केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात लसीकरणच्या मोहीमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये व अन्य अशा 139 केंद्रांवर दिवसभरात 15 हजार 580 जणांना लशीचा पहिला डोस, तर 898 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यात 18 ते 30 वयोगटांतील तब्बल 11 हजार 288 तरुणांचा समावेश होता, तर खासगी हॉस्पिटलच्या तीन केंद्रांवर 211 जणांनी लस देण्या आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com