दोन दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा लसीकरण

कोव्हिशिल्डचे 26 हजार तर कोव्हॅक्सिनचे 3 हजार 320 डोस प्राप्त
दोन दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा लसीकरण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा होता. त्यामुळे शहरासह अनेक तालुक्यातील लसीकरण केंद्र बंद होती.

मात्र सोमवारी सायंकाळी कोव्हिशिल्डचे 26 हजार तर कोव्हॅक्सिनचे 3 हजार 320 डोस प्राप्त झाले आहे. त्यामुळे मंगळवार 22 जून पासून जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाचा सुरुवात होणार आहे.

शासनाकडून लसीकरणासाठी घालून देण्यात आलेल्या नियम काही प्रमाणात शिथील केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला आहे. यातच आता केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्विकारल्याने आता तरुणांमध्ये देखील लसीकरणाचा उत्साह वाढला आहे.

परंतु जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे जळगाव शहरासह काही अन्य तालुक्यातील लसीकरण केंद्र बंद होती. मात्र सोमवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण सुरळीत होणार आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध केंद्रांवर 3,272 जणांना पहिला डोस, तर 379 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

जिल्ह्यात 29 हजार डोस प्राप्त

जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिम ठप्प झाली होती. मात्र सोमवारी सायंकाळी जिल्ह्यासाठी कोविशील्डचे 26 हजार 120 डोस, तर कोव्हॅक्सीनचे 3,320 डोस असे एकूण 29 हजार 440 डोस प्राप्त झाले आहेत.

खासगी रुग्णालयातही लसीकरण

लसीकरणाची मोहीम अधिक गतीने राबविण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेत खासगी हॉस्पिटलला सहभागी करून घेण्यात आले आहे. यापैकी गायत्री हॉस्पिटलमध्ये 2 हजार 210 तर संवेदना हॉस्पिटलमध्ये 1 हजार 290 असे 3,500 कोविशील्डचे, तर विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सीनचे 3 हजार 590 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी ताळकटत बसावे लागणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com