जिल्ह्यात करोनाचे 48 नवे बाधित

101 रुग्ण करोनामुक्त : 1 हजार 312 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
जिल्ह्यात करोनाचे 48 नवे बाधित

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाची दुसरी लाट गेल्या दिवसांपासून मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. सोमवारी केवळ 48 रुग्ण आढळून आले असून 101 रुग्णांची करोनावर मात केली आहे.

दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नसून सहा तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 1, जळगाव ग्रामीण 5, चोपडा 7, पाचोरा 4, धरणगाव 3, एरंडोल 3, रावेर 1, पारोळा 4, चाळीसगाव 14, मुक्ताईनगर 2, असे एकूण 48 रुग्णांचा समावेश आहे. भुसावळ, अमळनेर, भडगाव, यावल, जामनेर व बोदवड या सहा तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 982 एवढे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर आजपावेतो 1 लाख 38 हजार 102 एवढ्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

सद्यस्थितीला 1 हजार 312 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com