जिल्ह्यात 64 नवे बाधित रुग्ण

131 करोनामुक्त; एकाचा मृत्यू
जिल्ह्यात 64 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 64 रुग्ण आढळून आले असून, एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 131 रुग्णांनी यशस्विरित्या करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 3, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 5, अमळनेर 00, चोपडा 2, पाचोरा 4, भडगाव 1, धरणगाव 04, यावल 21, एरंडोल 03, जामनेर 02, रावेर 03, पारोळा 03, चाळीसगाव 05, मुक्ताईनगर 03, बोदवड 02 असे एकूण 64 रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी जिल्ह्यात केवळ भुसावळ तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 785 एवढी झाली आहे. तर 1 लाख 37 हजार 636 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत करोनावर मात केली आहे.

तसेच आतापर्यंत 2 हजार 566 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 1 हजार 583 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com