जिल्ह्यात 63 नवे बाधित रुग्ण

144 करोनामुक्त; एकाचा मृत्यू
जिल्ह्यात 63 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यासह जिल्ह्यात करोनाची तीव्रता कमी होतांना दिसत आहे. जिल्ह्यात केवळ 1 हजार 651 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून नव्याने 63 रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून दिवसभरात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 1, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 3, अमळनेर 4, चोपडा 3, पाचोरा 6, भडगाव 0, धरणगाव 10, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 3, रावेर 5, पारोळा 4, चाळीसगाव 8, मुक्ताईनगर 2, बोदवड 3 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 63 रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी जिल्ह्यात केवळ रावेर तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 721 एवढी झाली आहे. तर 1 लाख 37 हजार 505 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत करोनावर मात केली आहे.

तसेच आतापर्यंत 2 हजार 565 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 1 हजार 651 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com