जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरतेय

सलग दुसर्‍या दिवशी करोनाचे नवे 80 रुग्ण : 242 बाधित करोनामुक्त
जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरतेय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.

आज शुक्रवारी 11 जून रोजी जिल्ह्यात नव्याने 80 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 242 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 7, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 6, अमळनेर 3, चोपडा 5, पाचोरा 8, धरणगाव 1, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 4, रावेर 4, पारोळा 2, चाळीसगाव 25, मुक्ताईनगर 2, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 80 रुग्णांचा समावेश आहे.

भडगाव तालुक्यात आज कोरोनाचा नवा एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज शुक्रवारी जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 369 एवढी झाली आहे.

तर 1 लाख 36 हजार 684 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच आजपावेतो उपचार सुरु असतांना 2 हजार 560 एवढ्या बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com