जिल्ह्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात कमी 80 रुग्णांची नोंद

दिवसभरात 261 जण करोनामुक्त तर केवळ 1 बाधित रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात कमी 80 रुग्णांची नोंद
File Photo

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.

दुसर्‍या लाटेतील सर्वाधिक कमी 80 बाधित रुग्णांची नोंद गुरुवारी 10 जून रोजी झाली असून दिवसभरात 261 बाधित रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहे. तसेच केवळ एकच बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.

राज्यासह जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्ये दिवसागणिक घट होत आहे. गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात रुग्णांना बेड देखील मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता हजारोच्या संख्ये बेड शिल्लक असून बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमण देखील अत्यल्प होत आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 5, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 3, पाचोरा 7, भडगाव 4, धरणगाव 0, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 2, पारोळा 6, चाळीसगाव 24, मुक्ताईनगर 0, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 80 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 289 एवढी झाली आहे. तर 1 लाख 36 हजार 442 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 2 हजार 288 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून गुरुवारी जिल्ह्यात केवळ पारोळा तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 559 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यात सद्यास्थितीला 2 हजार 288 अ‍ॅक्टिव्हव रुग्ण असून दिवसेंदिवस त्यामध्ये संख्येत घट होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com