जिल्ह्यात 490 रुग्ण करोनामुक्त

दिवसभरात 158 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 490 रुग्ण करोनामुक्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे.

सोमवारी दिवसभरात जिल्हाभरात कोरोनाचे 158 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 490 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तसेच जिल्ह्यात केवळ चार जणांचा मृत्यू झाला असून बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे ही बाब दिलासादायक ठरत आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 7, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 14, अमळनेर 6, चोपडा 2, पाचोरा 16, भडगाव 2, धरणगाव 1, यावल 8, एरंडोल 19, जामनेर 7, रावेर 4, पारोळा 2, चाळीसगाव 47, मुक्ताईनगर 2, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 158 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 39 हजार 958 एवढी झाली आहे. तर 1 लाख 31 हजार 874 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून सोमवारी जिल्ह्यात केवळ 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील तीन तर रावेर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 532 इतकी झाली असून अ‍ॅक्टिव्हव रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com