पॉझिटिव्ही दरात जळगाव जिल्हा राज्यात दुसर्‍या स्थानी

पॉझिटिव्ही दरात जळगाव जिल्हा राज्यात दुसर्‍या स्थानी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाच्या दुसरी लाटेत सुरुवातीला काही दिवस करोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. नव्याने 100 ते 200 रुग्ण आढळून येत होते. यानंतर हा आकडा 1500 पर्यंत जावून भिडला होता.

आता करोनाची लाट मंदावत असल्याचे चित्र असून सर्वात कमी पॉझिटीव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा हा राज्यात दुसर्‍या क्रमाकांवर आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 3.83 इतका खाली आला आहे. सर्वात पहिल्या क्रमाकांवर राज्यातील भंडारा हा जिल्हा असून त्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 3.44 एवढा आहे. अशी माहिती आज बुधवारी कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 15 फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर अचानक पुढच्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढू लागली होती. मात्र आठ दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असून नवीन बाधित रुग्णांची प्रमाणत देखील कमी झाले आहे. पुर्वी दिवसाला जिल्ह्यात 4 ते 5 हजार चाचण्या केल्या जात होत्या. दुसर्‍या लाटेत चाचण्यांची संख्या ही दिवसाला 17 ते 18 हजारांपर्यंत गेली होती. त्यातून बाधित रुग्णांचे प्रमाण देखील वाढले होते. मात्र वेळीच निदान वेळीच उपचार या अंतर्गत तसेच जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनसह कडक निर्बंधामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी दरही वाढला

गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी दर हा 91.24 एवढा होता. नव्याने आढळून येणार्‍या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण हे दुप्पट तसेच तिप्पट असल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या रिकव्हरी दरातही वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांचा जिल्ह्याचा रिकव्हरी दर 93.38 एवढा आहे. गेल्या आठवड्यात 18 मे रोजी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 36 हजार 285 एवढा होता. यात आठवडाभरात 2 हजार 621 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट म्हणजे 5 हजार 380 बाधितांनी आठवभरात कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com