जिल्ह्यात 221 नवे बाधित रुग्ण

दिवसभरात 331 करोनामुक्त; 7 पैकी जामनेर तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 221 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे.

बुधवारी दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 221 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील पाच जणांचा समावेश असून ही जामनेर तालुक्यासाठी चिंताजनक बाब आहे. तसेच 331 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 33, जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 4, अमळनेर 8, चोपडा 5, पाचोरा 1, भडगाव 5, धरणगाव 1, जामनेर 36, रावेर 23, पारोळा 5, चाळीसगाव 36, मुक्ताईनगर 13, बोदवड 14 व इतर जिल्ह्यातील 2 याप्रमाणे एकूण 221 नवीन बाधित रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 39 हजार 137 एवढी झाली आहे. तर 1 लाख 30 हजार 57 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

मृत्यूदर आटोक्यात

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून बुधवारी जिल्ह्यात 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जामनेर तालुक्यातील पाच, एरंडोल व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 510 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com