जिल्ह्यात 805 बाधित रुग्णांची करोनावर मात

नव्याने 291 रुग्ण आढळले : 8 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात 805 बाधित रुग्णांची करोनावर मात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर मंदावत असल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 291 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 805 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात उपचारादरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला 6 हजार 687 अ‍ॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर 33, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 21, अमळनेर 9, चोपडा 12, पाचोरा 18, धरणगाव 12, यावल 5, एरंडोल 13, जामनेर 21, रावेर 19, पारोळा 15, चाळीसगाव 52, मुक्ताईनगर 17, बोदवड 16, व इतर जिल्ह्यातील 9 याप्रमाणे एकूण रुग्णांचा समावेश आहे. भडगाव तालुक्यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

मंगळवारी जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील 4, भडगाव, बोदवड, पाचोरा व चाळीसगाव या तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 38 हजार 916 एवढी झाली आहे. तर 1 लाख 29 हजार 726 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच आजपोवेता 2 हजार 503 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com