जिल्ह्यातील तीन तालुक्यात आज एकही रुग्ण नाही

दिवसभरात 312 नवे रुग्ण तर 897 करोनामुक्त; 8 जणांचा मत्यू
जिल्ह्यातील तीन तालुक्यात आज एकही रुग्ण नाही

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे.

आज दिवसभरात जिल्हाभरात कोरोनाचे 312 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 8 जणांचा मृत्यू झाला असून 897 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट झाली आहे. तसेच जिल्ह्यात आज यावल, एरंडोल व पारोळा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 13, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 153, अमळनेर 10, चोपडा 9, पाचोरा 8, भडगाव 6, धरणगाव 14, जामनेर 11, रावेर 20, चाळीसगाव 29, मुक्ताईनगर 17, बोदवड 11, व इतर जिल्ह्यातील 8 याप्रमाणे एकूण 312 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 38 हजार 625 एवढी झाली आहे. तर 1 लाख 28 हजार 921 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण घटले

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून सोमवारी जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यातील तीन, यावल तालुक्यातील दोन तर जामनेर, पाचोरा व पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 495 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com