जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट

दिवसभरात 405 नवे रुग्ण तर 878 करोनामुक्त; 9 जणांचा मत्यू
जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील कमी झाली आहे.

आज दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 405 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला असून 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट असल्याने जिल्ह्यात करोनाचा कहर मंदावतोय असे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आज 22 मे रोजी दिवसभरात 405 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 37 हजार 951 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 27 हजार 167 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 16, जळगाव ग्रामीण 8, भुसावळ 31, अमळनेर 23, चोपडा 36, पाचोरा 32, भडगाव 2, धरणगाव 14, यावल 22, एरंडोल 25, जामनेर 48, रावेर 31, पारोळा 17, चाळीसगाव 55, मुक्ताईनगर 16, बोदवड 23 आणि इतर जिल्ह्यातील 10 असे एकूण 405 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍यांची संख्या घटली

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून शनिवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यातील 3, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जळगाव शहर व यावल तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 478 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com