जिल्ह्यात आढळले तब्बल १०९८ करोनाबाधित रुग्ण

एका दिवसात १९ रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या गेली ३६ हजार ६४० वर
जिल्ह्यात आढळले तब्बल १०९८ करोनाबाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी करोना पॉझिटिव्ह १०९८ रुग्ण आढळले.जिल्ह्यातील...

करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३६ हजार ६४० झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ३७०, जळगाव ग्रामीणमधील ५१, भुसावळ येथील ७६, अमळनेरातील १०६, चोपडा येथील ९७, पाचोरा येथील ४६, भडगावातील ११, धरणगावमधील ५१, यावल येथील २३, एरंडोल येथील ३९, जामनेरातील १२, रावेर येथील ७१, पारोळा येथील १८, चाळीसगावमधील ७२, मुक्ताईनगरातील २९, बोदवड येथील १४, परजिल्ह्यातील १४ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ८४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ७१८ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ९६६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण १९ रुग्ण गुरुवारी दगावले.

यापैकी ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ०३ मृत्यू, ०३ मृत्यू पाचोरा, ०१ रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ, ०१ भडगाव, ०२ सुविधा हॉस्पिटल, ०३ मृत्यू रुबी हॉस्पिटल तर ०१ रुग्णाचा मृत्यू आरुषी हॉस्पिटल येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील ४५, ७३ वर्षीय पुरुष व ७५, ८० वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील ५२, ६२,७५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील ५८,६८ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, भडगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, जामनेर तालुक्यातील ४५ वर्षीय महिला, एरंडोलल तालुक्यातील ४५ वर्षीय महिला, यावल तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com