जिल्ह्यात सव्वालाख रुग्ण करोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.54 टक्क्यांवर; 4 लाख 52 हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात सव्वालाख रुग्ण करोनामुक्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाची साखळी तोडण्यसाठी शासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे बाधित रुग्णंच्या संख्येत घट झाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत करोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 37 हजार 136 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 533 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात 9 हजार 143 क्टीव्ह रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 460 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.54 टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.79 टक्क्यांपर्यत आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणार्‍या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणार्‍या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 10 लाख 65 हजार 838 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 37 हजार 136 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 9 लाख 25 हजार 270 अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या 1 हजार 635 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सध्या 6 हजार 871 रुग्ण होम क्वारंटाईन असून 281 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 9 हजार 143 रुग्णांपैकी 7 हजार 421 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 722 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 52 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 841 नागरीकांना कोरोनाचा पहिला डोस तर 1 लाख 13 हजार 247 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार नागरीकांचे लसीकरण सुरु असून सध्या 45 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे.

उपचार घेतलेले तालुकानिहाय रुग्ण

जळगाव शहर-804, जळगाव ग्रामीण-316, भुसावळ-1032, अमळनेर-386, चोपडा-830, पाचोरा-450, भडगाव-84, धरणगाव-315, यावल-377, एरंडोल-389, जामनेर-792, रावेर-609, पारोळा-243, चाळीसगाव-999, मुक्ताईनगर-890, बोदवड-490 व इतर जिल्ह्यातील-137 असे एकूण 9 हजार 143 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय मृत्यू झालेल्यांची संख्या

जळगाव शहर-556, जळगाव ग्रामीण-138, भुसावळ-323, अमळनेर-141, चोपडा-160, पाचोरा-129, भडगाव-74, धरणगाव-104, यावल-130, एरंडोल-106, जामनेर-145, रावेर-169, पारोळा-44, चाळीसगाव-115, मुक्ताईनगर-80, बोदवड-46 असे एकूण 2 हजार 460 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com