जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त

357 रुग्ण नवे ; 675 रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या मंदावतांना दिसत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब मानली आहे.

आज 20 मे रोजी दिवसभरात 357 कोरोनाबाधित आढळले असून दुसरीकडे 675 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तसेच दिवसभरात उपचारादरम्यान 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 318 ने जास्त असून अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्याही 328 ने कमी झाली आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळूल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 44, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 47, अमळनेर 15, चोपडा 47, पाचोरा 4, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 10, जामनेर 13, रावेर 20, पारोळा 9, चाळीसगाव 39, मुक्ताईनगर 40, बोदवड 29 अन्य जिल्ह्यातून 7 रुग्णांचा समावेश आहे.

आज गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी 2, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, व पारोळा या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आजतागायत 1 लाख 37 हजार 136 रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 25 हजार 533 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 2 हजार 460 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com