जिल्ह्यात बाधितांची लक्षणीय घट

494 नवे करोना रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात बाधितांची लक्षणीय घट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या मंदावतांना दिसत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब मानली आहे.

आज बुधवारी दिवसभरात 494 कोरोनाबाधित आढळले असून दुसरीकडे 512 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तसेच दिवसभरात उपचारादरम्यान 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळूल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 44, जळगाव ग्रामीण 17, भुसावळ 78, अमळनेर 18, चोपडा 49, पाचोरा 9, भडगाव 1, धरणगाव 25, यावल 33, एरंडोल 22, जामनेर 34, रावेर 31, पारोळा 7, चाळीसगाव 47, मुक्ताईनगर 40, बोदवड 37 अन्य जिल्ह्यातून 02 रुग्णांचा समावेश आहे.

आज बुधवारी दिवसभरात उपचारादरम्यान 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात 4, जळगाव तालुका, भुसावळ, यावल तालुक्यात प्रत्येकी 2 तर बोदवड, एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आजतागायत 1 लाख 36 हजार 779 रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 24 हजार 858 रुग्ण करोनामुक्त झाले असून, 2 हजार 450 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यास्थितीला 9 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com