जिल्ह्यात 665 रुग्ण करोनामुक्त
करोनामुक्त

जिल्ह्यात 665 रुग्ण करोनामुक्त

521 नवे बाधित; 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास सुरुवात झाल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

मंगळवारी नव्याने 521 करोनाबाधित आढळले असून, 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात उपचारादरम्यान 11 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने 521 रग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर 51, जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 51, अमळनेर 04, चोपडा 54, पाचोरा 03, भडगाव 02, धरणगाव 14, यावल 37, एरंडोल 19, जामनेर 70, रावेर 50, पारोळा 15, चाळीसगाव 70, मुक्ताईनगर 44, बोदवड 15 अन्य जिल्ह्यातून 09 रुग्णांचा समावेश आहे.

जळगाव शहरातील पाच जणांचा मृत्यू

दिवसभरात उपचारादरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील पाच तर जळगाव ग्रामीण, जामनेर, यावल, धरणगाव, भडगाव, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.

आतापर्यंत 1 लाख 24 हजार 346 रुग्ण करोनामुक्त

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आजतागायत 1 लाख 36 हजार 285 रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 24 हजार 346 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 2 हजार 438 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यास्थितीला 9 हजार 501 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com