जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट; दिवसभरात 622 नवे रुग्ण तर 652 करोनामुक्त
जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मृत्यू होणार्‍यांची संख्येत किंचितशी घट झाल्याने प्रशासनाकडून जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

आज दिवसभरात करोनाचे 622 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 10 जणांचा मृत्यू झाला असून 652 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात आज 17 मे रोजी दिवसभरात 622 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 35 हजार 764 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 23 हजार 681 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 62, जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 72, अमळनेर 25, चोपडा 48, पाचोरा 29, भडगाव 11,धरणगाव 17, यावल 61, एरंडोल 20, जामनेर 35, रावेर 58,पारोळा 27, मुक्ताईनगर 19, चाळीसगाव 54, बोदवड 35 आणि इतर जिल्ह्यातील 15 असे एकूण 622 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍यांची संख्या घटली

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून सोमवारी जिल्ह्यात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील चार, जळगाव शहरातील तीन, यावल व पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 427 इतकी झाली आहे.

175 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 175 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com