जिल्ह्यात 618 नवे बाधित रुग्ण

11 जणांचा मृत्यू : दिवसभरात 670 रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यात 618 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुगणांच्या संख्येसह मृत्यू होणायांच्या संख्येत देखील घट होत आहे. आज दिवसभरात करोनाचे 618 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.

तसेच 11 जणांचा मृत्यू झाला असून 670 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही जळगावकरांनासाठी समाधानाची बाब ठरत आहे.

जिल्ह्यात आज 15 मे रोजी दिवसभरात 618 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 34 हजार 511 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 670 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 22 हजार 452 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 66, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 57, अमळनेर 39, चोपडा 85, पाचोरा 6, भडगाव 4,धरणगाव 35, यावल 34, एरंडोल 45, जामनेर 60, रावेर 32,पारोळा 0, मुक्ताईनगर 32, चाळीसगाव 58, बोदवड 35 आणि इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 618 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात अकरा जणांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून शनिवारी जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील चार, यावल तालुक्यातील दोन तर जळगाव तालुका, पाचोरा, रावेर व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 406 इतकी झाली आहे.

237 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 237 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com