जळगाव : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येत घट

681 नवे बाधित रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येत घट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी नव्याने 681 करोनाबाधित रुग्ण आढळले असून दिवसभरात 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तसेच 811 करोनाबाधितांनी करोनामुक्त झाले असल्याने कोरोनाचा कहर मंदावतोय. गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासा देणार आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 60, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 82, अमळनेर 29, चोपडा 68, पाचोरा 4, भडगाव 3, धरणगाव 29, यावल 32, एरंडोल 44, जामनेर 16, रावेर 47, पारोळा 35, मुक्ताईनगर 72, चाळीसगाव 92, बोदवड 34 आणि इतर जिल्ह्यातील 18 असे एकूण 681 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

9 बाधित रुग्णांचा मृत्यू

शनिवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहर, भडगाव व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा तर जळगाव तालुका, धरणगाव व बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 33 हजार 893 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 21 हजार 782 एवढे बाधित करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत उपचारादरम्यान 2 हजार 395 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com