जिल्ह्यात करोनाचे 789 रुग्ण

12 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात करोनाचे 789 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 789 करोनाबाधित रुग्ण आढळले असून दिवसभरात 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

करोनाचा कहर मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. दरम्यान दिवसभरात 816 रुग्णांनी यशस्वीपणे करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 122, जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 106, अमळनेर 16, चोपडा 37, पाचोरा 29, भडगाव 15,धरणगाव 7, यावल 41, एरंडोल 11, जामनेर 30, रावेर 50,पारोळा 27, मुक्ताईनगर 161, चाळीसगाव 87, बोदवड 23 आणि इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 789 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये जळगाव शहर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी 3, धरणगाव, पारोळा प्रत्येकी 2 तर जळगाव, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 33 हजार 422 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 20 हजार 971 एवढे बाधित करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत उपचारादरम्यान 2 हजार 386 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com