जिल्ह्यात करोनाचे 849 नवे बाधित रुग्ण

11 जणांचा मृत्यू ; अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ओसारतेय
जिल्ह्यात करोनाचे 849 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बाधित रुगणांच्या संख्येत घट होत आहे. मात्र मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात करोनाचे 849 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.

तसेच 11 जणांचा मृत्यू झाला असून 847 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही जळगावकरांनासाठी समाधानाची बाब ठरत आहे.

जिल्ह्यात आज 12 मे रोजी दिवसभरात 849 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 32 हजार 423 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 847 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 20 हजार 155 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 86, जळगाव ग्रामीण 22, भुसावळ 163, अमळनेर 26, चोपडा 42, पाचोरा 15, भडगाव 8,धरणगाव 15, यावल 25, एरंडोल 22, जामनेर 61, रावेर 52,पारोळा 16, मुक्ताईनगर 171, चाळीसगाव 48, बोदवड 51 आणि इतर जिल्ह्यातील 26 असे एकूण 849 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍या रुग्णांमध्ये घट

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. बुधवारी जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भुसावळ, चाळीसगाव, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असून जळगाव शहर, जामनेर व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 374 इतकी झाली आहे.

1284 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1284 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com