जिल्ह्यात 843 नवे करोना बाधित

740 कोरोनामुक्त; 14 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात 843 नवे करोना बाधित
Corona

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी 843 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 740 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात 843 नवे बाधित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 1 लाख 31 हजार 574 रुग्णसंख्या झाली आहे. तर दिवसभरात 740 रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत 1 लाख 19 हजार 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मंगळवारी जळगाव शहरात 69, जळगाव ग्रामीण 25, भुसावळ 89, अमळनेर 94, चोपडा 107, पाचोरा 79, भडगाव 3, धरणगाव 26, यावल 20, एरंडोल 28, जामनेर 64, रावेर 51, पारोळा 14, चाळीसगाव 62, मुक्ताईनगर 63, बोदवड 42, अन्य जिल्ह्यातील 7 असे एकूण 843 रुग्ण आढळून आले आहे.

तसेच दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, यावल, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी दोन तर भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, रावेर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 363 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com