दिलासादायक...जिल्ह्यात कोरोनाचा कहर मंदावतोय

858 नवे बाधित; 16 रुग्णांचा मृत्यू; 1005 रुग्ण करोनामुक्त
दिलासादायक...जिल्ह्यात कोरोनाचा कहर मंदावतोय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात काही दिवसांपासून करोना बाधितांचा आलेख वाढला होता. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे चित्र दिलासादायक दिसून येत आहे.

गुरुवारी नव्याने 858 रुग्ण आढळले असून, 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1005 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करुन 15 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या कालावधीत अत्यावश्यक वस्तुंसह जीवनावश्यक वस्तुंसाठी वेळेची मर्यादा निश्चित करुन दिल्याने काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आले आहे.

त्यामुळे करोनाचा कहर मंदावल्याचे चित्र दिसून येत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब मानली जात आहे.

गुरुवारी दिवसभरात 858 बाधित आढळले आहेत. यात जळगाव शहर 134, जळगाव ग्रामीण 35, भुसावळ 120, अमळनेर 25, चोपडा 41, पाचोरा 75, भडगाव 09, धरणगाव 22, यावल 32, एरंडोल 23, जामनेर 59, रावेर 32, पारोळा 23, चाळीसगाव 107, मुक्ताईनगर 65, बोदवड 47 तर अन्य जिल्ह्यातील 09 रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1,27,311 इतकी रुग्णसंख्या झाली आहे. त्याचबरोबर 1,15,474 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर तीन, पाचोरा, रावेर, भडगाव, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर यावल तालुक्यात एकाचा समावेश आहे.

आतापर्यंत 2,288 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com