जिल्ह्यात 999 नवे बाधित तर 18 रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात 1 हजार 37 रुग्ण कोरोनामुक्त; अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ओसारतेय
जिल्ह्यात 999 नवे बाधित तर 18 रुग्णांचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बाधित रुगणांच्या संख्येत घट झाली होती. परंतु आज पुन्हा बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आज दिवसभरात जिल्ह्यात 999 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 1 हजार 37 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे.

जिल्ह्यात आज 5 मे रोजी दिवसभरात 999 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 26 हजार453 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 1 हजार 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 14 हजार 469 इतकी झाली आहे. नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 160, जळगाव ग्रामीण 32, भुसावळ 136, अमळनेर 147, चोपडा 15, पाचोरा 60, भडगाव 25,धरणगाव 17, यावल 26, एरंडोल 60, जामनेर 49, रावेर 59,पारोळा 32, मुक्ताईनगर 61, चाळीसगाव 82, बोदवड 20 आणि इतर जिल्ह्यातील 18 असे एकूण 999 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यूदर आटोक्यात येईना

गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात 18 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये पाचोरा व रावेर तालुक्यात प्रत्येकी चार, एरंडोल तालुक्यात तीन, अमळनेर तालुक्यात दोन तर जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, पारोळा, यावल तालुक्यात प्रत्येकी एकाचा समाावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 272 इतकी झाली आहे.

1 हजार 104 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1 हजार 104 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com