जिल्ह्यात 1076 बाधित करोनामुक्त

808 नवे रुग्ण; 19 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात 1076 बाधित करोनामुक्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे करोनाची साखळी तुटण्यास सुरुवात झाल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

मंगळवारी नव्याने 808 रुग्ण आढळले असून, 1076 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर दिवसभरात 19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 9 हजार 768 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जिल्ह्यात काही प्रमाणात करोनाचा कहर मंदावतांना दिसतो आहे. मंगळवारी दिवसभरात 808 रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर 153, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 133, अमळनेर 27, चोपडा 29, पाचोरा 16, भडगाव 17, धरणगाव 09, यावल 25, एरंडोल 19, जामनेर 38, रावेर 78, पारोळा 32, चाळीसगाव 69, मुक्ताईनगर 78, बोदवड 46 अन्य जिल्ह्यातील 08 रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात 19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील 04, जळगाव, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी 03 तर चोपडा, रावेर, जळगाव शहर, बोदवड, भुसावळ, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

1 लाख 13 हजार 432 रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 25 हजार 454 करोना बाधित रुग्ण आढळले असून, 1 लाख 13 हजार रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com