करोनाचा कहर मंदावतोय

महिनाभरात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या सर्वाधिक
करोनाचा कहर मंदावतोय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या दुसर्‍या लाटेने आतापर्यंतचे सर्व आकडे मोडीत काढत उच्चांक गाठला होता. परंतु आता जिल्ह्यात दुसरी ओसरत असून एप्रिल महिन्यात 32 हजार 982 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.

यात 559 रुग्णांचा मृत्यू झाला असून 33 हजार 569 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या गेल्या महिन्यात सर्वाधिक असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा कहर मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

गेल्या सव्वा वर्षापासून देशात करोनाने हाहाकार माजविला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. डिसेंबमध्ये करोनाची लाट ओसरत असलयाने पूर्वपदावर येत असतांनाच पुन्हा दुसर्‍या लाटेने देशभरात कोरोनाचा विळखा घातला.

त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाची लाट आली असून पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अधिक तीव्र दिसून आली.

त्यामुळे करोनाच साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करुन 15 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अतयावश्यक सेवा वगळता जीवनाशवश्यक वस्तूंसाठी वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी झाली आहे. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच बाधितांची संख्या आता मंदावतांना दिसून येत आहे.

एप्रिल महिन्याने गाठला सर्वाधिक रुग्णांचा आकडा

दुसर्‍या लाटेत एप्रिल महिन्यात राज्यभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. यातच जिल्ह्यात देखील दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आतापर्यंतचे सर्व आकडे मोडीत काढत एप्रिल महिन्यात बाधित रुग्णांनी 1 हजार 201 रुग्णांचा आकडा गाठला होता. दरम्यान दररोज हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने महिन्याभरात 32 हजार 986 रुग्ण आढळून आले होते.

बरे होणार्‍यांची संख्या 33 हजारांपेक्षा अधिक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दररोज वाढ होत आहे. गेल्या महिन्याभरात बरे होणारे देखील हजारापेक्षा अधिक होत असून आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या ही 33 हजार 569 इतकी झाली आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने हे जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे.

जिल्ह्याचा मृत्यूदर 1.69 टक्क्यांवर

गेल्यावर्षी जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक होता. परंतु काही महिन्यानंतर तो आटोक्यात आल्यानंतर जिल्ह्याचा मृत्यूदर हा 1 टक्क्यांपर्यंत आला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाचा मृत्यूदर वाढला असून जिल्ह्याचा मृत्यूदर हा 1.69 टक्क्यांवर आला आहे.

अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचीही संख्या घटली

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अवघे 344 क्टीव्ह रुग्ण होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन फेब्रुवारी अखेर ही संख्या 2505 वर पोहोचली. मार्चअखेर जिल्ह्यातील क्टीव्ह रुग्णांची संख्या तब्बल 11803 वर गेली होती. तर 13 एप्रिल, 2021 रोजी जिल्ह्यातील क्टीव्ह रुगणांची संख्या 11821 या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.

जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्याही 1450 ने कमी झाली ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब ठरत आहे.

ग्रामीण भागात 42 हजार रुग्णांची करोनावर मात

कोरोना संसर्गाच्या साथीचा उद्रेक जिल्हयात झाल्याने त्याचे लोण ग्रामीण भागातही वाढले आहे. जळगाव शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील भुसावळ,अमळनेर, पारोळा, धरणगाव,आणि चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊन ही ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत.

त्यानंतर पाचोरा, भडगाव, एरंडोल, चोपडा, जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर,बोदवड यासह संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आतापर्यंत 48 हजार 823 करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नव्या 5हजार 734 नवीन कोरोनाबाधित उपचार घेत आहे.कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असली तरी आतापर्यंत 42 हजार 388 करोनामुक्त झाले आहेत.

मात्र वर्षभरात 701 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोना नियंत्रणासाठी 4 हजार 99 ठिकाणी कंटेन्टमेंट झोन केले आहेत. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या टीमकडून जिल्ह्याभरात कोरोना रोखण्यासाठी कंबर कसली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com