जामनेर : तपासणी शिबिरात २३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह

जामनेर : तपासणी शिबिरात २३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह

वाकोद, ता. जामनेर - Jamner :

वडाळी ता. जामनेर येथे जी.एम.फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.२७ रोजी कोरोना तपासणीसाठी अँटीजेन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

१२५ व्यक्तिंनी तपासणी केली त्यामध्ये २३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले .

यावेळी जि.प.सदस्य अमित देशमुख, बाबुराव घोंगडे, अरविंद देशमुख, वासुदेव घोंगडे, वडाळी चे सरपंच संजय बनसोडे, सुभाष शिनगारे, मधुकर आवटे, मोहन गोसावी, उपसरपंच शितल आवटे, राजु पाटील, अमीर तडवी, सागर आवटे, विशाल घोरपडे, कौतीक आवटे, सचिन पाटील, संदिप सावळे, अनिल आस्कर, राहूल शिनगारे, महेंद्र आवटे, भागवत घोरपडे, सुरेश शिनगारे व राहूल वडाळे उपस्थित होते.

शिबीरातील पाॅझिटीव्ह रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन उपचारासाठी सल्ला दिला.शिबीर यशस्वितेसाठी डाॅ. जाधव, डाॅ.चव्हाण, डाॅ.बापु काटकर, निलेश भामरे, आशा स्वयंसेविका ज्योती कुचेकर यांचे सहकार्य लाभले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com