जिल्ह्यात 1 हजार 7 बाधित रुग्ण तर 21 जणांचा मृत्यू

दिवसभरात 1 हजार 30 रुग्ण करोनामुक्त; अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट
जिल्ह्यात 1 हजार 7 बाधित रुग्ण तर 21 जणांचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी ;

जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून शनिवारी जिल्ह्यात 1 हजार 7 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 1 हजार 30 रुग्ण करोनामुक्त झाले असून बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या आता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात आज 30 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 7 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 22 हजार 4 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 1 हजार 30 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 9 हजार 159 इतकी झाली आहे. नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 141, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 101, अमळनेर 47, चोपडा 32, पाचोरा 148, भडगाव 8, धरणगाव 12, यावल 31, एरंडोल 58, जामनेर 112, रावेर 47,पारोळा 17, मुक्ताईनगर 111, चाळीसगाव 58, बोदवड 61 आणि इतर जिल्ह्यातील 3 असे एकूण 1 हजार 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यूदर आटोक्यात येईना

गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा, चोपडा तालुक्यातील प्रत्येकी तीन, रावेरख बोदवड, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जळगाव तालुकयातील एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 184 इतकी झाली आहे.

1 हजार 843 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1 हजार 843 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com