जिल्ह्यात 1103 रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात 1103 रुग्णांची करोनावर मात

1 हजार 63 नवे रुग्ण : अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 205 बाधित

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू करुन लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्यामुळे मागील 15 दिवसांच्या तुलनेने नव्याने आढळून येणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

दरम्यान आज दि. 29 रोजी नव्याने 1 हजार 63 बाधित रुग्ण आढळून आले असले तरी 1 हजार 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिवसभरात 21 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 167, जळगाव ग्रामीण 21, भुसावळ 93, अमळनेर 205, चोपडा 90, पाचोरा 47, भडगाव 9, धरणगाव 20, यावल 28, एरंडोल 86, जामनेर 126, रावेर 46, पारोळा 19, चाळीसगाव 74, मुक्ताईनगर 2, बोदवड 23 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 1 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी जिल्ह्यात 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी 4, भुसावळ, रावेर तालुक्यात प्रत्येकी 3, एरंडोल, जामनेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर चाळीसगाव, बोदवड तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधितांचा समावेश आहे.

आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 163 इतकी झाली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 997 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 1 लाख 8 हजार 129 एवढे बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com