सारा हॉस्पिटलसह भुसावळतील दोन कोविड रुग्णालयांना नोटीस

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पाहणीअंती रुग्णालयात आढळल्या अनेक त्रूटी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी दिली आहे.

मात्र शासनाच्या मार्गदर्शनक नियमांचे याठिकाणी पालन होत नसल्याने तसेच अनेक त्रूटी जिल्हा शल्यचिकीत्सकांना पाहणीअंती आढळून येत असल्याने आज सारा रुग्णालयासह भुसावळातील समर्पण आणि रिदम कोविड रुग्णालयाला नोटीस बजावित दोन दिवसात खुलासे मागविले आहेत.

जळगावातील सारा रुग्णालयात ऑक्जिसनचा पुरवठा खंडीत झाल्याने सावदा येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता.

ही घटना गंभीर स्वरुपाची असून येत्या दोन दिवसात लेखी खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास रुग्णालयावर कार्यवाही करण्यात येईल.

अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी भुसावळातील समर्पण आणि रिदम कोविड रुग्णालयांना भेट देवून पाहणी केली आहे.

दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाई

समर्पण रुग्णालयात नोंदणीकृत नसलेले डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. पीपीई किट एकाही स्टाफने घातलेले नव्हते.

ऑक्सिजनचा प्रमाणापेक्षा अधिक वापर, अग्निशमन, बायोमेडीकल वेस्टचे व्यवस्थापन नाही सर्वत्र अस्वच्छता, रुग्णाच्या प्रकृतीची माहिती दिली जात नाही.

अशा अनेक त्रूटी आढळून आल्या आहेत. तसेच रिदम रुग्णालयात व्हेंटीलेटर सेक्शन उपलब्ध नव्हते. ऑक्जिसनचा प्रमाणापेक्षा अधिक वापर, अग्निशमन यंत्रेणेची व्यवस्था नाही.

तपासणीवेळी केवळ एकच डॉक्टर उपलब्ध, शासकीय दरपत्रकानुसार रुग्णांची फी आकारणी केली नव्हती अशा अनेक त्रूटी आढळून आल्याने भूसावळातील या दोन्ही कोविड रुग्णालयांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. दोन दिवसात खुलासा न सादर केल्यास कारवाईचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com