बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

20 बाधितांचा मृत्यू तर 1 हजार 6 नवे रुग्ण तर 1 हजार 125 करोनामुक्त
बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.

मात्र आता बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी जिल्ह्यात 1 हजार 6 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 125 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज 28 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 6 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 19 हजार 934 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 1 हजार 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 7 हजार 26 इतकी झाली आहे. नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 173, जळगाव ग्रामीण 47, भुसावळ 130, अमळनेर 60, चोपडा 97, पाचोरा 47, भडगाव 11, धरणगाव 33, यावल 25, एरंडोल 73, जामनेर 38, रावेर 70,पारोळा 20, मुक्ताईनगर 90, चाळीसगाव 50, बोदवड 35 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 1 हजार 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू

बुधवारी जिल्ह्यात 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी तीन, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा या तालुक्यातील प्रत्येकी दोन तर अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, पारोळा, रावेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 142 इतकी झाली आहे.

1 हजार 378 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1 हजार 378 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com