जिल्ह्यात करोनाचे 1012 नवे रुग्ण

23 बाधितांचा मृत्यू : 995 बाधित करोनामुक्त
जिल्ह्यात करोनाचे 1012 नवे रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 27 एप्रिल रोजी 1 हजार 12 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 23 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 995 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 163, जळगाव ग्रामीण 56, भुसावळ 49, अमळनेर 43, चोपडा 52, पाचोरा 59, भडगाव 33, धरणगाव 27, यावल 26, एरंडोल 100, जामनेर 59, रावेर 96, पारोळा 37, चाळीसगाव 64, मुक्ताईनगर 17, बोदवड 120 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 1 हजार 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मंगळवारी जिल्ह्यात 23 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 5, रावेर तालुक्यात 4, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी 3, जळगाव , बोदवड तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जामनेर तालुक्यात 1 याप्रमाणे बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा संख्या 1 लाख 18 हजार 928 एवढी झाली आहे. तर आजपर्यंत 1 लाख 5 हजार 901 इतके बाधित करोनामुक्त झाले आहेत.

आजपर्यंत एकूण 2 हजार 122 एवढ्या बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com