जिल्ह्यात 1048 बाधित रुग्ण

21 जणांचा मृत्यू : शहरात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या घटली
जिल्ह्यात 1048 बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून सोमवारी जिल्ह्यात 1 हजार 48 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज 26 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 48 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 17 हजार 916 एवढी झाली आहे.

तर दुसरीकडे 1 हजार 15 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 4 हजार 906 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 159, जळगाव ग्रामीण 53, भुसावळ 157, अमळनेर 71, चोपडा 72, पाचोरा 57, भडगाव 18,धरणगाव 42, यावल 33, एरंडोल 113, जामनेर 37, रावेर 74,पारोळा 28, मुक्ताईनगर 54, चाळीसगाव 37, बोदवड 15 आणि इतर जिल्ह्यातील 16 असे एकूण 1 हजार 48 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच

सगल दोन आठवड्यांपासून सोमवारी जिल्ह्यात 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाचोरा तालुक्यातील चार, एरंडोल व जळगाव शहरातील प्रत्येकी तीन, भुसावळ व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव शहर व धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 99 इतकी झाली आहे.

989 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे.

आज जिल्ह्यात सुमारे 989 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com