27 दिवसांच्या बाळाने केली करोनावर मात

27 दिवसांच्या बाळाने केली करोनावर मात

सिव्हीलमध्ये यशस्वी उपचार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनामुळे आज अनेक जण धास्तावले, कोरानापेक्षा त्याच्या भितीने अनेकांची झोप उडली आहे. शहरासह जिल्ह्यात दररोज 20 बाधितांचे उपचारादरम्यान मृत्यूही होत असून वृध्दांसह तरुणांचाही यात समावेश असल्याने चिंताही वाढली आहे.

मात्र अशातच आज रविवारी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शासकीय महाविद्यालयातच जन्मलेल्या 27 दिवसांच्या नवजात बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

बाळाची व एसएनसीयु टीमची झुंज यशस्वी

येथील तुकारामवाडी येथील रहिवासी अंशू योगेश चौधरी या महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, म्हणून 29 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभागात दाखल करण्यात आले होते.

बाळाचा पहिला स्वॅब निगेटिव्ह आला. परंतु बाळाचा श्वासाचा त्रास सुरूच होता. म्हणून हृदयाची तपासणी करून घेतली त्या तपासणीत अ‍ॅट्रीअल सेप्टल डिफेक्ट असल्याचे समजले.

बाळाच्या पांढर्‍या पेशी खूप जास्त वाढल्याने व श्वासाचा त्रास वाढल्याने प्रोटोकॉलनुसार दुसरा स्वॅब सातव्या दिवशी पुन्हा पाठवला. तो पॉझिटिव्ह आला.

तिला योग्य ती काळजी घेऊन कार्यरत स्टाफ व टीमने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले.

27 दिवसांनी ही बाळाची व एसएनसीयु टीमची झुंज यशस्वी ठरली. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ.शैलजा चव्हाण आदी वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले. आज 27 व्या दिवशी बाळ सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com