विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी, 3 जण करोनाबाधित

विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी, 3 जण करोनाबाधित

जळगाव - Jalagon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर शहरात विनाकारण फिरणार्‍यांची अ‍ॅन्टीजन तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे.

आज शनिवारी सायंकाळी शहर पोलीस स्टेशनतर्फे टॉवर चौकात मोहिम राबविण्यात आली. यात विनाकारण फिरणार्‍या एकूण 189 जणांची अ‍ॅन्टीजन चाचणी करण्यात आली. यात 3 जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात शासन आदेशानुसार कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्याक सेवांना परवानगी आहे. तर 11 वाजेनंतर केवळ मेडीकल, रुग्णालये किंवा अत्यविधी या कारणासाठी परवानगी आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात रात्री संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्‍यांची अ‍ॅन्टीजन चाचणीची मोहिम राबविण्यात आली होती.

आज शनिवारी सायंकाळी पुन्हा शहर पोलीस स्टेशनतर्फे टॉवर चौकात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे तसेच विनाकारण फिरणार्‍या अशा एकूण 189 जणांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली.

यात तीन जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी ही मोहिम राबविली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com