चाळीसगाव : करोना मृत्यूचा आकडा शंभरी पार

दिवसभरात दोघांचे मृत्यू , आजघडीला ४७८ बाधितरुग्ण
चाळीसगाव : करोना मृत्यूचा आकडा शंभरी पार

चाळीसगाव - chalisgaoan - प्रतिनिधी :

चाळीसगाव तालुक्यात करोनाचे कहर सुरुच असून करोना बांधित मृत्यूचा संख्येने आज शंभरी पार केली आहे.

आज दिवसभरात करोना बाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आजघडीला तालुक्यात ४७८ जण करोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.

करोनामुळे मृत्यूची वाढती संख्या पाहता, आतातरी चाळीसगावकरांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याची नित्यांत गरज आहे.

समाधानाची बाबा म्हणजेे आतापर्यंत ६ हजार ३११ जणांना करोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ६ हजार ८४६ जण जणांना कोरोनाची लागन झाली आहे.

करोनाची आकडेवारी पाहता हि चिताजनक असून नागरिकानी शासनाच्या नियावलीचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, नाहीतर मृत्यूच्या आकडेवारीत आपले देखील एक दिवस नाव येवू शकते. हे विसरता काम नये.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com