जिल्ह्यात करोनाचे नवे 1034 रुग्ण

18 बाधितांचा मृत्यू; करोनाने मृत्यूचा एकूण आकडा 2 हजार पार
जिल्ह्यात करोनाचे नवे 1034 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच करोना बाधितांचा मृत्यू होणार्‍यांची संख्याही चिंताजनक आहे.

आज 22 एप्रिल रोजी दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 34 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात 1 हजार 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 175, जळगाव ग्रामीण 47, भुसावळ 86, अमळनेर 67, चोपडा 58, पाचोरा 53, भडगाव 10, धरणगाव 42, यावल 67, एरंडोल 54, जामनेर 111, रावेर 96,पारोळा 24, मुक्ताईनगर 18, चाळीसगाव 49, बोदवड 70 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 1 हजार 34 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी सलग जिल्ह्यात 18 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 6, धरणगाव, एरंडोल, रावेर व चाळीसगाव या तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर भडगाव, पारोळा, जामनेर आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे बाधितांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 704 एवढी झाली आहे. तर कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 758 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आजपावेतो 2 हजार 16 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com