जळगाव जिल्ह्यात 1142 नवे बाधित रुग्ण

22 जणांचा मृत्यू : मृत्यू होणार्यांची संख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर
जळगाव जिल्ह्यात 1142 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू होणार्यांची दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही आठवड्याभरापासून जिल्ह्यात दररोज मृत्यू होणार्यांची संख्या वाढत आहे.

आज दिवसभरात 22 जणांचा मृत्यू झाला असल्याने जिल्ह्यात मृत्यू होणार्यांची संख्या ही 2 हजाराच्या उंबठ्यावर पोहचली आहे. तसेच 1 हजार 142 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 1 हजार 134 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात आज 21 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 142 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 12 हजार 670 एवढी झाली आहे.

तर दुसरीकडे 1 हजार 134 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्यांची संख्या ही 99 हजार 554 इतकी झाली आहे.

यात जळगाव शहर 189, जळगाव ग्रामीण 39, भुसावळ 114, अमळनेर 35, चोपडा 105, पाचोरा 66, भडगाव 0, धरणगाव 18, यावल 27, एरंडोल 65, जामनेर 257, रावेर 104, पारोळा 31, मुक्ताईनगर 38, चाळीसगाव 18, बोदवड 1 आणि इतर जिल्ह्यातील 5 असे एकूण 1 हजार 142 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू 8 जळगाव शहरात

बुधवारी सलग आठव्या दिवशी जिल्ह्यात तब्बल 22 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू जळगाव शहरातील 8 इतकेे झाले असून भुासवळ, चोपडा तालुकयातील प्रत्येकी चार, पाचोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्यांची संख्या ही 1 हजार 998 इतकी झाली आहे.

907 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 907 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com