फायर ऑडिट पुर्तता नसल्यास कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी

माजी स्थायी सभापती तथा नगरसेविका शुचिता हाडा यांची मागणी
फायर ऑडिट पुर्तता नसल्यास कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी

जळगाव- Jalgaon :

जळगाव शहरातील सर्व कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट मनपा प्रशासनाने त्वरीत तपासावे. यात नियमाप्रमाणे पुर्तता नसल्यास ताबडतोब कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी.

अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राव्दारे केली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर महापालिका क्षेत्रात अनेक खासगी हॉस्पिटल्स्नी कोविड रुग्णालये सुरु केली आहेत. वास्तविक पाहता, फायर ऑडिट तपासून त्यानंतरच परवानगी देणे बंधनकारक आहे.

मात्र अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिटची पुर्तता झाली नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीची दुर्घटना घडली होती.

भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट तपासावे. यात आवश्यक ती पुर्तता नसल्यास किंेवा नियमांचे पालन केले नसल्यास कोविड हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी. अशी मागणी ऍड. शुचिता हाडा यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com